Headlines
Loading...
महाराष्ट्र राज्यातील जंगलांचे वर्गीकरण | Classification of forests in the state of Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील जंगलांचे वर्गीकरण | Classification of forests in the state of Maharashtra

 महाराष्ट्र राज्यातील वनांचे वर्गीकरण१) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने : 


 • या प्रकारची वने वार्षिक २०० सेमी. हून अधिक पावसाच्या प्रदेशात आढळतात. 


 • प्रामुख्याने पश्चिम घाट, सह्याद्री घाटमाथा, गाविलगड (अमरावती), चंद्रपूर, गडचिरोली येथे ही वने आढळतात.


 • उष्ण कटिबंधीय सदाहरित वनांमध्ये खालील प्रमुख वृक्षांचा समावेश होतो 


जांभूळ, पिसा, पारजांब, पांढरा सिडार, नागचंपा, फणस, शिसव, कावशी, मॅग्नेलिया, ओक, बांबू, कोकम, हिरडा, तेल्याताड.


२) उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने : 


 • या प्रकारची वने सामान्यपणे वार्षिक १५० ते २०० सेमी पावसाच्या प्रदेशात आढळतात. 


 • उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने सह्याद्रीचा पचिम व पूर्व उतार तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोणावळा या जिल्ह्यांत आढळतात.


 • उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वनांमध्ये प्रामुख्याने खालील वृक्षांचा समावेश होतो 


किंजळ, हिरडा, बेहडा, रानफणस, कदंब, शिसम, किंडल, बिबळा, सावर, किन्हई, ऐन, वावळी, जीबत, नाणा, हेदू, गेळा.


 • उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वनाची वैशिष्ट्ये : 


डोंगरभागात 'कुमरी' हा स्थलांतरित शेती प्रकार आढळतो. वनस्पतींची विविधता, रुंदपर्णी व सर्वात उंच वने. वृक्षांची उंची : ६० ते ६५ मीटर.३) उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने : 


 • उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने हि वार्षिक ३५० ते ४०० सेमी. पावसाच्या प्रदेशात आढळतात. 


 • महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, आंबोली, भिमाशंकर, अस्तंभा डोंगर, गाविलगड टेकड्यांत ही वने आढळतात.


 • उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वनांमध्ये प्रामुख्याने खालील वृक्षांचा समावेश होतो : 


 • अंजन, हिरडा, बेहडा, आंबा, जांभूळ, शेंद्री, रानफणस, सुरंगी, पिशा, लाल देवदार, पारजांब, काटेकुवर, येवती, फांगळा, रामेण, बामणी, दिंडा, फापटी, ओंबळ४) आर्द्र पानझडी वने (मोसमी वने) : 


 • मोसमी वने हि वार्षिक १२५ ते २०० सेमी. पावसाच्या प्रदेशात आढळतात.


 • महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रात या वनांचे प्रमाण सुमारे ३०% आहे.


 • गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, सुरजागड, टिपरागड; चांदूरगड (जि. चंद्रपूर), नवेगाव (भंडारा) तसेच कोल्हापूर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांत; हरिश्चंद्र-बालाघाट, सातमाळा, महादेव डोंगरांत ही वने आढळतात.


 • आद्र  पानझडी वनांमध्ये प्रामुख्याने खालील वृक्षांचा समावेश होतो :


सागवान, शिसम, सावर, हळदू, बीजा, कळंब, ऐन, बोंडारा, शिरिष, धावडा, अंजन, अर्जुन, सादडा, खैर, आवळा, बिबळा. • साग हा या वनांतील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे.


 • बाष्पीभवन टाळण्यासाठी हे वृक्ष कोरड्या ऋतूत स्वतःची पाने गाळतात. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे प्राणहिता नदीकाठी आढळणाऱ्या या वनांना 'अल्लापल्ली वने' म्हणतात.


५) शुष्क पानझडी वने : 


 • शुष्क पानझडी वने वार्षिक ५० ते १०० सेमी. पावसाच्या प्रदेशात आढळतात. 


 • विदर्भ, सह्याद्रीचा पूर्व उतार, सातपुडा, धुळे, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत ही वने आढळतात.


 • राज्यातील एकूण वनक्षेत्रात या वनांचे प्रमाण ६० ते ६२% इतके आहे.


 • शुष्क पानझडी वनांमध्ये प्रामुख्याने खालील वृक्षांचा समावेश होतो 


सावर, आवळा, तिवस, चारोळी, बेहडा, शेंदरी, चेरी, पळस, बारतोंडी, बेल, खैर, धामण, टेंबुर्णी, बोर, बाभूळ, बीजसाल. 


 • विरळ स्वरुपाची ही वने जळणासाठी उपयुक्त आहे.६) शुष्क काटेरी वने : 


 • या प्रकारची वने वार्षिक ५० सेमी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात आढळतात.


 • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत ही वने आढळतात. 


 • शुषक काटेरी वनांमध्ये प्रामुख्याने खालील वृक्षांचा समावेश होतो


बोर, बाभूळ, कोरफड, खैर, सालई, निवडुंग, निंब, हिवर, टाकळा.


 • राज्यातील एकूण वनक्षेत्रात या वनांचे प्रमाण १७% इतके आहे. ७) खाजणवने (मॅग्रोव्ह वने) : 


 • नारळ, ताड, माड, पोफळी, कांदळ, चिपी, मरांडी, तीस, तिवर, काजळी, सुंद्री.


 • पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखांशी दलदलीच्या खाजणक्षेत्रात ही वने आढळतात. (प्रमाण : ०.१ ते ०.२%) 


 • पर्यावरण समतोलासाठी कोणत्याही प्रदेशातील ३३% जमीन वनांखाली असणे गरजेचे असते.

 • २००६ : महाराष्ट्रात वनसंवर्धनासाठी 'संत तुकाराम वनग्राम योजना' सुरू.


 • उद्देश : अवैध वृक्षतोडीला विरोध, वनसंपतीचे संरक्षण, वने व वन्यजीवांबाबत जागृती.


 • २०१५ : मानव व वन्यजीव सहजीवनासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना सुरू केली. 


 • नागपूर या प्रशासकीय विभागात सर्वाधिक वनक्षेत्र आहे तर औरंगाबाद या विभागात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. 


 • महाराष्ट्रात घनदाट वनक्षेत्र पश्चिम घाट, नागपूर विभाग व अमरावती विभागात एकवटले आहे.


 • राज्यातील सर्वाधिक वने :

 • १) विदर्भ : ५५%, २) पश्चिम महाराष्ट्र : ४०%, ३) मराठवाडा : ५%


 •  सर्वाधिक वनक्षेत्राचे जिल्हे (उतरता क्रम) : 


१) गडचिरोली (सर्वाधिक) 

२) रत्नागिरी 

३) चंद्रपूर 

४) अमरावती 


 •  सर्वात कमी वनक्षेत्राचे जिल्हे (चढ़ता क्रम) : 


१) मुंबई शहर (सर्वात कमी) 

२) लातूर

३) उस्मानाबाद

४) सोलापूर


 • वनांचे उपयोग : साग, ऐन, खैर, शिसव हे वृक्ष इमारती व फर्निचरसाठी • 

 • कोरफड - औषधनिर्मितीसाठी. 


 • कागदनिर्मिती कारखान्यात (उदा. बल्लारपूर-चंद्रपूर) कच्चा माल म्हणून बांबू व वेत वापरतात.


 • सिरपूर (आंध्र प्रदेश) व सेंट्रल पल्प मिल (गुजरात) या कागदगिरण्यांना महाराष्ट्रातील जंगलांतून कच्चा माल पुरवला जातो.


 • खैरापासून कात बनवला जातो. (डहाणू, चंद्रपूर)


 • आगकाड्या बनविण्यासाठी 'सेमल' (शाल्मली) या वृक्षाचे मृदू लाकूड वापरतात. 


 • धुळे, नंदूरबार येथील 'रोशा' गवतापासून सुगंधी तेल बनविले जाते.


 • हिरड्यापासून 'टॅनिन' बनविले जाते.


 • बाभूळ, निंब यांच्या लाकडापासून शेती औजारे, तर त्यांच्या सालीचा उपयोग कातडी कमविण्यासाठी. 


 • महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी 'शतकोटी वृक्ष लागवड' ही योजना सुरू केली आहे.