
Information about Thane District in Marathi | ठाणे जिल्हा बद्दल संपूर्ण माहिती
Information about Thane District in Marathi | ठाणे जिल्हा बद्दल संपूर्ण माहिती
उत्तर कोकणात पश्चिम किनाऱ्यावरील कोकण या प्रशासकीय विभागातील जिल्हा.
ठाणे जिल्ह्याचे मुख्यालय : ठाणे.
ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ : ४२१४ चौकिमी
स्थान व विस्तार :
पश्चिमेस : अरबी समुद्र,
दक्षिणेस : रायगड जिल्हा,
नैऋत्येस : मुंबई उपनगर व मुंबई शहर हे जिल्हे,
पूर्वेस : सह्याद्री रांगा व त्यापलिकडे
ईशान्येस : नाशिक,
उत्तरेस : पालघर जिल्हा.
ठाणे जिल्ह्यातील तालुके :
ठाणे जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत
१) ठाणे
२) भिवंडी
३) शहापूर
४) मुरबाड
५) कल्याण
६) उल्हासनगर
७) अंबरनाथ.
महानगरपालिका :
ठाणे हा राज्यातील सर्वाधिक सहा (६) महानगरपालिकांचा जिल्हा.
१) ठाणे
२) नवी मुंबई
३) कल्याण-डोंबिवली
४) उल्हासनगर
५) भिवंडी-निजामपूर
६) मीरा-भाईंदर
ठाणे जिल्ह्यातील नद्या :
वैतरणा व उल्हास या प्रमुख नद्या, सूर्या, तानसा, पिंजळ या अन्य नद्या.
ठाणे : तलावांचे शहर
ठाणे जिल्ह्यातील धरणे :
वैतरणा नदीवरील 'मोडकसागर',
तानसावरील तानसा धरण,
भातसावरील भातसा धरण,
बारवी धरण (कल्याणठाणे नदी),
सूर्या नदीवर सूर्या (धामणी) धरण.
शहापूर हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो.
सर्वाधिक धरणांच्या संख्येमुळे ठाणे जिल्ह्यास 'पाणी पिकविणारा जिल्हा' म्हणतात.
जिल्ह्यातील प्रमुख पिके :
तांदूळ (भात), वरी, नाचणी. • फळपिके : डहाणूचे चिक्कू, वसईची केळी.
औद्योगिक माहिती :
ठाणे-पुणे-बेलापूर या पट्ट्यातील विकसित औद्योगिक जिल्हा.
अभियांत्रिकी, लोह-पोलाद, औषधे व रसायने निर्मिती उद्योग.
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे :
ठाणे : उल्हास नदीवरील प्रमुख बंदर
ठाण्याचे प्राचीन नाव : श्रीस्थानक
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे संरक्षण मंत्रालयाचा दारूगोळा व शस्त्रनिर्मिती कारखाना, अंबरनाथ येथील शिवमंदिर
कल्याणजवळील बाबा हाजीमलंग दर्गा.
वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी (ता. भिवंडी) येथे गरम पाण्याचे झरे.
टिटवाळा येथे सिद्धीविनायक महागणपती मंदिर हे मंदिर चिमाजी अप्पांनी पोर्तुगिजांवर वसई येथे विजय मिळविल्यावर बांधले.