Headlines
Loading...
Information about Palghar District | पालघर जिल्हा माहिती

Information about Palghar District | पालघर जिल्हा माहिती

Information about Palghar District | पालघर जिल्हा माहिती


Information about Palghar District | पालघर जिल्हा माहिती 


१३ जून २०१४ रोजी राज्य मंत्रिमंडळाचा ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय.

[ Decision of State Cabinet to divide Thane district on 13th June 2014 ]


१ ऑगस्ट २०१४ पासून ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून 'पालघर' हा राज्यातील एकूण ३६ वा जिल्हा अस्तित्वात.

तसेच पालघर जिल्हा परिषदेची भर पडल्याने राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या आता ३४ इतकी झाली आहे.

[ From 1st August 2014, Palghar became the 36th district in the state from the division of Thane district. Also, with the addition of Palghar Zilla Parishad, the number of Zilla Parishads in the state has come down to 34. ]

मुख्यालय : पालघर | Headquarters : Palghar 


पालघरचे क्षेत्रफळ : ५३४४ चौकिमी | Area of Palghar: 5344 Chowk 


स्थान व विस्तार | Location and extent : 

 • पालघरच्या उत्तरेस गुजरातमधील बलसाड जिल्हा व दादरा, नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश. 

 • आग्नेयस ठाणे जिल्हा. 

 • पूर्वेस नाशिक व ठाणे जिल्हा, 

 • पश्चिमेस अरबी समुद्र.


पालघर जिल्ह्यातील तालुके | Talukas in Palghar District : 

पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यांचा समावेश होतो ते खालील प्रमाणे आहेत


 1. पालघर

 2. वाडा

 3. विक्रमगड

 4. जव्हार

 5. मोखाडा

 6. डहाणू

 7. तलासरी

 8. वसई-विरार


पालघर जिल्ह्यात महानगरपालिका (१) : 

 1. वसई-विरार


पालघरमधील नगरपालिका (३) :

पालघर मध्ये तीन नगरपालिकांचा समावेश होतो त्या खालील प्रमाणे आहेत


 1. डहाणू

 2. पालघर

 3. जव्हार


पालघर जिल्ह्यातील नद्या : 

वैतरणा ही पालघर मधील मुख्य नदी आहे. तसेच बारवी, भातसा, पिंजल, सूर्या, दहेर्जा, तानसा, या इतर नद्या आहेत तसेच दक्षिणेस उल्हास नदीखोरे आहे


पालघर जिल्ह्यातील महत्वाची धरणे : 

 1. वांद्री धरण

 2. मनोर धरण


पालघर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे : 

 • जव्हार : पालघरचे महाबळेश्वर. 

 • सातपाटी येथे मच्छीमारी प्रशिक्षण संस्था.

 • वसई किल्ला (१७३९ मध्ये पोर्तुगिजांकडून चिमाजीआप्पांनी हा किल्ला जिंकला), 

 • अर्नाळा किल्ला, 

 • कळवा बीच, 

 • माहीम बीच, 

 • वाघोबा धबधबा, 

 • शीतलादेवी मंदिर, 

 • विरारची जीवदानी देवी, 

 • तारापूर हा देशाचा पहिला अणुविद्युत प्रकल्प देखील पालघर जिल्ह्यात आहे.

 • वसई येथे 'चिंचोटी' धबधबा

 • जव्हार येथे लेंडी नदीवरील 'दाभोसा' धबधबा. 

 • कसायाजवळ 'विहिगाव' धबधबा.