Headlines
Loading...
महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैशिष्ट्ये | Important Things about Maharashtra In Marathi

महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैशिष्ट्ये | Important Things about Maharashtra In Marathi

महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैशिष्ट्ये |Important Things about Maharashtra In Marathi


या लेखामध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील

 

1.     महाराष्ट्र राज्य कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे?

2.     महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

3.     दख्खनच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते?

4.     महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो?

5.     महाराष्ट्र राज्यात कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण? झाले आहे?

6.     महाराष्ट्र राज्यात कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे?

7.     विदर्भ कोणत्या खनिजांनी समृद्ध आहे?

8.     महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिके कोणती आहेत?

9.     महाराष्ट्र राज्यातील नगदी पिके सांगा?

10.            महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर येतो महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?

11.            महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे?

12.            महाराष्ट्र राज्यात कोणते किल्ले आहेत?

13.            महाराष्ट्र राज्याचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे?


 ·       महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे.

 
·       महाराष्ट्र राज्यातील कळसूबाई हे सर्वोच्च शिखर (उंची : १६४६ मी.) सह्याद्री रांगांत आहे.
 
·       दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते; तिला रेगुर म्हणतात
 
·       आंबोली (जि. सिंधुदुर्ग, कोकण) येथे महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो.
 
·       बुलढाणा जिल्ह्यातील 'लोणार' हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर.
 
·       पूर्वेकडील विदर्भाचा प्रदेश साग, बांबू यांच्या वनांसाठी तसेच कोळसा, लोह व मँगनीज या खनिजांनी समृद्ध आहे
 
 
·       ज्वारी, तांदूळ, बाजरी, गहू ही महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिके आहे
 
·       ऊस, कापूस, तंबाखू, गळीत धान्ये ही नगदी पिके.
 
·       कापड गिरण्या व साखर कारखान्यांची रेलचेल.
 
·       फळ लागवडीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
 
·       नागपूरची संत्री, जळगावंची केळी, नाशिक-सांगलीची द्राक्षे, रत्नागिरीचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे.
 
·       मुंबई : महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी.
 
·       नागपूर : राज्याची उपराजधानी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने बौद्ध धर्माचा स्वीकार या नागभूमीतच केला.
 
·       कोयना वीजकेंद्र, जायकवाडी धरण, तारापूरचे अणुवीज केंद्र, अरबी समुद्रातील 'बॉम्बे हाय' तेलक्षेत्र व इतर अनेक उद्योगधंद्यांनी राज्याच्या वैभवात भर टाकली आहे.
 
·       ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारे मुरूड-जंजीरा, सिंधुदुर्ग, समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पुनीत
 
·       झालेला सज्जनगड, छत्रपती शिवरायांचे जन्मघर असलेला शिवनेरी, राजमाता जिजाऊंचे माहेरघर असलेला सिंदखेड राजा; रायगड आदी प्रेक्षणीय किल्ले.
 
·       शेती हा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय.