Headlines
Loading...
चंद्राबद्दल संपूर्ण माहिती । Information about Moon in Marathi

चंद्राबद्दल संपूर्ण माहिती । Information about Moon in Marathi

चंद्राबद्दल संपूर्ण माहिती । Information about Moon in Marathi


नमस्कार मित्रांनो आज आपण चंद्राबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला खाली दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील 
 1. चंद्राची त्रिज्या किती आहे?

 2. चंद्राचे वस्तुमान किती आहे?

 3. चंद्राचा व्यास किती आहे?

 4. पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर किती आहे?

 5. चंद्राचे सूर्याकडे बाजूचे तापमान किती आहे?

 6. चंद्राचे सूर्याच्या विरुद्द बाजूचे तापमान किती आहे?

 7. चंद्राचे गुरुत्वाकर्षण किती आहे?

 8. चंद्राचा परिवलन व परिभ्रमण काळ किती आहे?

 9. चांद्रमास म्हणजे काय?

 10. भरती ओहोटी का येते?

 11. कृष्ण पक्ष म्हणजे काय?

 12. शुक्ल/शुद्ध पक्ष म्हणजे काय?

 13. चंद्र दररोज सारख्या वेळी उगवतो का?

 14. चंद्राची कक्षा कशी आहे?

 15. सौम्य चांदणे म्हणजे काय?

 16. संपूर्ण चंद्र आपल्याला दिसतो का?

 17. उपभू म्हणजे काय?

 18. अपभू म्हणजे काय?

पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र. 


 • चंद्राची त्रिज्या : १७३७.१० किमी. 


 • वस्तुमान : पृथ्वीच्या १.२% 


 • पृथ्वीपासून सरासरी अंतर : सुमारे ३,८४,४०० किमी. 


 • चंद्राचा व्यास : ३४७६ किमी. (अंदाजे)


 • चंद्राचे सूर्याकडील बाजूचे तापमान : १२१° सें. 


 • सूर्याच्या विरुद्ध बाजूचे तापमान (उणे) - १५६° सें. : 


 • चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या १/६ पट (एक सष्ठांश पट) असल्याने आपण चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत सहापट जास्त उंच उडी मारू शकतो.


 • चंद्राचे वस्तूमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या १/८१ पट


 • चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या १/३.७ पट. 


 • चंद्राचा परिवलन (स्वतःभोवती फिरणे) काळ व परिभ्रमण (चंद्र पृथ्वीभोवती फिरतो) काळ सारखाच म्हणजे सुमारे २७ दिवस ७ तास ४३ मिनिटे ११.३ सेकंद इतका असतो, त्यास नाक्षत्रमास असे म्हणतात.


 • चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गती चा कालावधी सारखाच असल्याने आपणास चंद्राची सतत एकच बाजू दिसते. 


 • चांद्रमास : चंद्राच्या एका कलेपासून दुसऱ्या कलेपर्यंत  (अमावस्या ते अमावस्या) काळ २९ दिवस, १२


 • तास, ४४ मिनिटे, २.८ सेकंद इतका असतो. त्यास चांद्रमास म्हणतात.


 • चांद्रमासाचा उपयोग पंचांगात कालमापनासाठी केला जातो. 


 • चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. 


 • चंद्राच्या परिभ्रमण गतीचे परिणाम : चंद्रकला दृष्टीस पडतात.


 • चंद्राच्या परिभ्रमणामुळे सागराला भरती-ओहोटी येते व पृथ्वीवरील भरतीच्या वेळा बदलतात. 


 • चंद्र दररोज ५० मिनिटे उशिरा उगवतो. 


 • चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास केवळ १.३ सेकंद लागतात.


 • पौर्णिमेच्या दिवशी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी असते. 


 • अमावस्येदिवशी पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये चंद्र असतो. 


 • वद्य पक्ष (कृष्ण पक्ष) : पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंतच्या १५ दिवसांच्या काळास वद्य पक्ष म्हणतात.


 • शुद्ध पक्ष (शुक्ल पक्ष) : अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंतच्या १५ दिवसांच्या काळास शुद्ध पक्ष म्हणतात. 


 • चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी ५°८' इतक्या मापाचा कोन करते. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत.


 • चंद्रावर वातावरण नाही. त्यामुळे तेथील आकाश काळेकुट्ट दिसते व कोणत्याही वस्तूची छाया दाट पडते. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही. त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो.


 • चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो.


 • चंद्राला मिळणाऱ्या एकूण सूर्यप्रकाशापैकी केवळ ७% प्रकाशच परावर्तित होतो. याला सौम्य चांदणे म्हणतात. 


 • चंद्राचा केवळ ५९% पृष्ठभागच पृथ्वीवरून नेहमी दिसतो. त्याच्याविरुद्ध दिशेचा भाग पृथ्वी समोर कधीच येत नाही.


 • चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस 'उपभू' स्थिती म्हणतात. 


 • चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्या स्थितीस चंद्राची 'अपभू' स्थिती म्हणतात.


 • शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये ९०° चा कोन होतो, म्हणून अष्टमीच्या दिवशी चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित दिसतो.


ग्रहणे : चंद्रग्रहण व त्याचे प्रकार


१) खंडग्रास चंद्रग्रहण : 


या प्रकारात पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमुळे चंद्राचा केवळ थोडाच भाग झाकला जातो. 


२) खग्रास चंद्रगहण : या प्रकारात पृथ्वीच्या सावलीमुळे संपूर्ण चंद्र झाकला जातो. 

वैशिष्ट्ये : चंद्रग्रहण पौर्णिमेदिवशी होते. मात्र प्रत्येक पौर्णिमेस चंद्रग्रहण होत नाही.


चंद्रग्रहण वेळी चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतात व चंद्र-सूर्याच्या मध्ये पृथ्वी असते. 


खग्रास चंद्रग्रहण जास्तीत जास्त १ तास ४७ मिनिटे (१०७ मिनिटे) टिकते.


वर्षातून कमीत कमी दोन व जास्तीत जास्त तीन चंद्रग्रहणे होतात. 


२७ जुलै २०१८ रोजी २१ व्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण झाले. ते १०३ मिनिटे टिकले.