
![]() |
Notes on Osmanabad District
मुख्यालय : उस्मानाबाद
क्षेत्रफळ : ७,५६९ किमी.
उस्मानाबाद हे 'मराठवाड्याचे प्रवेशद्वार' आहे.
स्थान व विस्तार :
मराठवाडा विभागात व औरंगाबाद या प्रशासकीय विभागात उस्मानाबादचा समावेश.
उस्मानाबादच्या पूर्वेस : लातूर,
आग्नेय व दक्षिणेस: कर्नाटक राज्य,
नैऋत्येस व पश्चिमेस : सोलापूर,
वायव्येस : अहमदनगर,
उत्तरेस : बीड जिल्हा
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके : ८
उस्मानाबाद
उमरगा
कळंब
तुळजापूर
परांडा
भूम
लोहारा
वाशी
उस्मानाबाद जिल्ह्यातील नद्या :
तेरणा ही मुख्य व सर्वात लांब नदी.
तेरणेचा उगम : तेरखेड (ता. कळंब)
जिल्ह्यातील प्रमुख पिके :
खरीब ज्वारी, रब्बी ज्वारी (शाळू), गहू, हरभरा, तूर, भुईमूग, उडीद.
उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे :
तुळजापूर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत माता तुळजाभवानीचे मंदिर.
उस्मानाबाद : पूर्वाश्रमीचे धाराशीव, भोगावती नदीकाठी, हजरत ख्वाजा शमसुद्दीन दर्गा.
तेर : उस्मानाबाद तालुक्यात तेरणा नदीकाठी संत गोरोबाकाकांचे जन्मगाव व समाधी.
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील भुईकोट किल्ला. या किल्ल्यात बोरी नदीवर नर-मादी धबधबा व पाणी महाल प्रसिद्ध.
वास्तूविशारद मीर महंमद इमादीन यांनी हा पाणी महाल बांधला.
मुख्य धरणे : बोरी धरण (ता. तुळजापूर)