Headlines
Loading...
सविनय कायदेभंगाची चळवळ | Notes on Savinay Kaydebhangachi chalval

सविनय कायदेभंगाची चळवळ | Notes on Savinay Kaydebhangachi chalvalसविनय कायदेभंगाची चळवळ : १९३० 


१९२९ च्या लाहोर अधिवेशनात 'संपूर्ण स्वराज्य' हे राष्ट्रसेभेचे ध्येय ठरविण्यात आले.


या अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव संमत करण्यात आला.


गांधीजींनी जोडीसाठी सरकारकडे संपूर्ण दारूबंदी, ५०% सारामाफी, देशी मालास संरक्षण, राजकीय


कैद्यांची मुक्तता इत्यादी ११ मुद्दे जाहीर केले. सरकारने या मुद्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे १४ फेब्रुवारी १९३० रोजी म. गांधीजींनी भारतीय जनतेस सविनय कायदेभंगाचा आदेश दिला.


सविनय कायदेभंगाचे स्वरूप


सविनय कायदेभंगाच्या चळवळीसाठी महात्मा गांधीजींनी 'मीठ' या जीवनावश्यक वस्तूची निवड 


ब्रिटिशांचे सर्व जुलमी कायदे मोडण्यासाठी प्रतिकात्मक असा मिठाचा सत्याग्रह करण्यात आला.


दांडीयात्रा : मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी १२ मार्च १९३० रोजी गांधीजीनी ७८ अनुयायांसह साबरमती आश्रमातून ३८५ कि.मी. (२४० मैल) वरील दांडी (गुजरात) येथे प्रयाण केले. 


नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दांडीयात्रेची तुलना 'नेपोलियन एल्बवरून पॅरीसकडे गेला' या घटनेशी केली.


५ एप्रिल १९३० रोजी २४ दिवसात गांधीजी दांडी येथे पोहोचले. 


६ एप्रिल १९३० रोजी दांडी समुद्रकिनाऱ्यावर गांधीजींनी मीठाचा कायदा मोडला व कायदेभंग चळवळीस (उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया!) 


भारतात जेथे समुद्रकिनारा होता तेथे (महाराष्ट्र बंगाल, ओडिशा, चेन्नई इ. ठिकाणी) मीठाचा सत्याग्रह करण्यात आला.


जेथे समुद्रकिनारा नव्हता तेथे इतर अन्यायकारक कायद्यांचा भंग करण्यात आला. उदा. बिळाशी जंगलसत्याग्रह 


खुदा-इ-खिदमतगार : बायव्य सरहर प्रांतात गांधीजींचे निष्ठावान अनुयायी खान अब्दुल गफारखान यांनी 'खुदा-इ-खिदमतगार' ही अहिंसक सत्याग्रहींची फौज निर्माण केली. 


खान अब्दुल गफारखान यांना सरहद्द गांधी या नावे ओळखले जाते. 


२३ एप्रिल १९३० रोजी पेशावरमध्ये या संघटनेने सविनय कायदेभंगास सुरूवात केली.


चंद्रासिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील गढवाल पलटणीने या सत्याग्रहींवर गोळी झाडण्यास नकार दिला. 


गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथे सरोजिनी नायडू यांनी आपल्या अनुयायांसह सत्याग्रह केला.


महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा येथे, तर कर्नाटकात 'सानिकत्रा' येथे मिठाचा सत्याग्रह झाला.


देशभरात जंगल सत्याग्रहींची संख्या ७० हजारांवर होती. 


बिहार व बंगालमध्ये चौकीदारी कराविरुध्द आंदोलन झाले.


गुजरातमधील खेडा, बाडॉली, जंबुसार, भरूच येथे माराबंदी चळवळ झाली. 'प्रभातफेरी' व मुलांची 'वानरसेना' सविनय कायदेभंग आंदोलनात आघाडीवर होती.


कायदेभंगाची वैशिष्ट्ये देशव्यापी चळवळ संपूर्ण अहिंसकरित्या पार पडलेली चळवळ. जनतेचा निःशस्त्र प्रतिकार 


सविनय कायदेभंगात सहभागी महिला : सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, कमला नेहरू, हेम प्रभादास, सुचेता कृपलानी, कस्तुरबा गांधी, हंसाबेन मेहता, अवंतिकाबाई गोखले,