Headlines
Loading...
स्वराज्य पक्ष | Swarajya Paksha Mahiti

स्वराज्य पक्ष | Swarajya Paksha Mahiti
स्वराज्य पक्ष : १९२३


गांधीजींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने नाराज झालेल्या तरुण नेतृत्वाने काँग्रेसचा त्याग केला व ९ जानेवारी १९२३ रोजी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची ( Swarajya Party )  स्थापना केली. 


संस्थापक (Founder) : 

चित्तरंजन दास (अध्यक्ष), मोतीलाल नेहरू (सचिव)


उद्देश (Purpose) : 

 1. निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करणे व जनतेच्या प्रश्नांवरून तेथे सरकारची अडवणूक करणे. 

 2. १९२३ च्या कायदेमंडळाच्या निवडणुकीत स्वराज्य पक्षाला १४५ पैकी ४५ जागांवर विजय मिळाला व कायदेमंडळातील

 3. तो सर्वात मोठा पक्ष बनला (Wikipedia मध्ये ३८ जागांवर विजय मिळाला अशी माहिती आहे)


स्वराज्य पक्षाचे लक्षणिय कार्य : 

 1. मुस्लिम लीगच्या सहाय्याने स्वराज्य पक्षाने अनेक सरकारी विधेयकांचा पराभव केला.  संपूर्ण जबाबदार राज्यपध्दतीची मागणी लावून धरली.

 2. गोलमेज परिषदांचा मागणी केली. 

 3. राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी केली.

 4. १९२५ मध्ये सी. आर. दास यांच्या निधनाने स्वराज्य पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाला. 


सायमन कमिशन, १९२७ : 


 1. १९१९ च्या माँट-फोर्ड सुधारणा कायद्यात 'दर दहा वर्षांनी भारतीयांना राजकीय सुधारणांचा हप्ता दिला जाईल' अशी तरतुद होती. त्यासंबंधीची पाहणी करण्यासाठी ब्रिटीशांनी ८ नोव्हेंबर १९२७ रोजी 'सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांचे एक कमिशन नेमले.

 2. डिसेंबर १९२७ : राष्ट्रीय सभेच्या चेन्नई येथील अधिवेशनात सायमन कमिशनवर बहिष्काराचा ठराव संमत.

 3. ३ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन कमिशन (संपूर्ण गोरे: Al White Commission) भारतात प्रथम मुंबई येथे आले. 

 4. सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतीयांनी 'सायमन परत जा' (सायमन गो बैंक) असे नारे देत या कमिशनवर बहिष्कार टाकला.लालाजींचा मृत्यू : 

 1. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी लाहोर येथे सायमन कमिशनविरूध्द निदर्शने करत असताना जेम्स स्कॉट या अधिकाऱ्याने लाठीहल्ल्याचा आदेश दिला. लाठीहल्ल्यात पंजाब केसरी लाला लजपतराय हे वृध्द नेते गंभीर जखमी झाले. 


 1. १७ नोव्हेंबर १९२८ : लालाजींचा हृदयविकाराने मृत्यू.


 1. "लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटिकेवर एकेक खिळा ठोकला जात आहे.” ~ लाला लजपतराय 


बार्डोली सत्याग्रह :

 1. १२ फेब्रुवारी १९२८ (बाडॉली हे 'बटर सिटी' म्हणून ओळखले जाते.)

 2. गुजरातमधील बाडली (जि. सुरत) परिसरात दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांचा सारा २५ टक्क्यांनी वाढविला होता, 

 3. यामुळे वल्लभभाई पटेल यांनी १९२८ साली बार्डोली येथे साराबंदी चळवळ उभारून ती यशस्वी केली. या घटनेमुळे जनता त्यांना 'सरदार पटेल' या नावे ओळखू लागली. (१२ जून १९२८ हा दिन सुरत येथे बाडॉली दिन म्हणून साजरा )


नेहरू रिपोर्ट ऑगस्ट १९२८ : 

 1. भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड याने भारतीयांना स्वतःची घटना स्वतःच बनविण्याचे आव्हान केले.

 2. पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे आव्हान स्वीकारून भारतीय घटनेचा आराखडा तयार केला. हाच 'नेहरू रिपोर्ट' होय.


नेहरू रिपोर्टमधील प्रमुख मागण्या :

 1. भारताला साम्राज्यातंर्गत वसाहतींचा दर्जा देण्यात यावा.

 2. भारतीयांना मुलभूत हक्क प्रदान करावेत. 

 3. प्रौढ मतदान पद्धती लागू करावी. 

 4. भाषावार प्रांतरचना करावी. 

 5. मुस्लीमांना राखीव जागा न मिळाल्याने बॅ. जीना यांनी नेहरू रिपोटर्टास विरोध केला व रिपोर्टास असलेल्या हरकती त्यांनी आपल्या प्रसिध्द 'चौदा मुद्यांत' मांडल्या.


१९२८ चे कोलकाता अधिवेशन (४३ वे) : 

 1. अध्यक्ष पं. मोतीलाल नेहरू (बसाहतीच्या स्वराज्याची मागणी) 

 2. या अधिवेशनात भारतास वसाहतीचे स्वराज्य देण्यास ब्रिटिश शासनास एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. 

 3. ब्रिटिशांनी ही मुदत पाळली नाही.


१९२९ चे लाहौर अधिवेशन (४४ वे): (संपूर्ण स्वराज्याची मागणी) 


 1. २५ ते ३१ डिसेंबर १९२९

 2. अध्यक्ष : पं. जवाहरलाल नेहरू

 3. वसाहतीच्या स्वराज्याच्या मागणीची एक वर्षाची मुदत सरकारने न पाळल्याने लाहोर अधिवेशनात 'संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव पास करण्यात आला. या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने 'बसाहतींचे स्वराज्य' या उद्दिष्टाचा त्याग केला व 'संपूर्ण स्वातंत्र्य' हे आपले ध्येय ठरविले,

 4. पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या युवकांचे नेते होते.

 5. ३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्री रावी नदी किनारी पं. जवाहरलाल नेहरू यांनी चरखांकित राष्ट्रीय ध्वज फडकाविला, २ जानेवारी १९३० रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत २६ जानेवारी १९३० हा भारताचा स्वातंत्र्यदिन (पूर्ण स्वराज्य) म्हणून पाळण्याची घोषणा करण्यात आली.

 6. २६ जानेवारी १९३० रोजी तिरंगा फडकावून हजारों भारतीयांनी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली, 

 7. लाहोर अधिवेशनातच सविनय कायदेभंगाचा ठराव मंजूर करण्यात आला.